विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस नागरिक मित्रांचा सहभाग

0
चोख बंदोबस्त ठेवण्यात केले सहकार्य
पिंपरी : दरवर्षी प्रमाणे यंदाही पोलीस नागरीक मित्रांनी वेगवेगळ्या घाटांवर व रत्यातील वाहतुकीला मार्गी लावण्यासाठी बरीच मदत केली. त्यामुळे गणेश उत्सव अगदी सुरळीत पार पडला. त्यात संस्थेचे कार्यकारीणी, सल्लागार, विभाग प्रमुख, संर्पक प्रमुख व सभासदांनी भाग घेतला होता.
पोलीस नागरीक मित्रांनी तर आपआपल्या परीने अकराही दिवस वेगवेगळ्या मंडळांजवळ बंदोबस्त केला. दिड, पाच, सात, नऊ व अकराव्या दिवशी विसर्जन घाटावर बरीच मदत केली. 13 रोजी 15, 14 रोजी 13, 15 रोजी 14, 16 रोजी 16, 17 रोजी 24, 18 रोजी 15, 19 रोजी 40, 20 रोजी 18, 21 रोजी 30, 22 रोजी 35, 23 रोजी 75 सभासदांनी बंदोबस्तात सहभाग घेतला. काही ठिकाणी गद्दीत हरवलेले लहान मुल सुखरुपपणे त्याच्या घरी पोहचवले. जेथे बंदोबस्तात होते तेथे पाकीटमारी, चोरी होऊ नये यासाठी बारीक लक्ष ठेवले. महीलांची छेडछाड होऊ दिली नाही. तसेच त्याचा प्रत्येक कामाचा आढावा त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या कमचार्‍यांना सांगत गेले. प्रामुख्याने निगडी, चिंचवड, पिंपरी पोलीस व वाहतूक नियंत्रण खात्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. गरजेच्या बाबींबद्दल सांगितले. अडचणीच्या वेळी सहकार्य केले. या सर्व पोलिसांचे आभार संस्थेचे सचीव राहुल श्रीवास्तव यांनी मानले.