चोपडा। बाबासाहेबांनी माणुसकीचा संदेश दिला. बाबासाहेबांचे विचार व पुतळे जगभरात पसरले आहेत कारण ते सामाजिक न्यायाचा प्रसार करतात. सामाजिक न्यायाची सुरुवात बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांच्या पुस्तकातील एकेक विचार जीवनाला दिशा देणारे आहेत. महाराष्ट्र हा जगभर शिवाजी महाराज आणि फुले-शाहू-आंबेडकरांमुळे महाराष्ट्र ओळखला जातो. भारताने जगाला दिलेली विसाव्या शतकाची सर्वात मोठी देणगी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होय, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी केले.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे तर प्रमुख उपस्थितांमध्ये आशिष गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य उदय ब्रम्हे, प्रा.आशिष गुजराथी हे उपस्थित होते. यावेळी प्रा.अनंत देशमुख व एस.बी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन भावेश लोहार यांनी केले. संस्थेच्या विविध विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.