सार्वजनिक वाहतुक व्यवस्था विस्कळीत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराची पर्यावरणीय स्थिती बिघडली असून याचा शहरी पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. याला शहरातील नागरिकही जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ञ इसिएचे चेअरमन विकास पाटील यांनी सांगितले आहे.
राज्यातील विविध भागातून नागरिक नोकरीधंद्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले आहेत. आपण राहतो आहोत शहराच्या एका टोकाला आणि नोकरी दुसऱ्या टोकाला करत आहे, त्यामुळे वाहनांची आवश्यकता असतेच. त्याचाही परिणाम पर्यावरणावर होत आहे.
शासनाने रस्ते मोठे केले , काही ठिकाणी एवढे मोठे केले कि रस्त्या शेजारची दुकाने घरे तोडून रस्ते रुंद केले तरी पण आज कोणताही रस्ता वाहनांनी गच्च भरलेला दिसतो .
शहरातील एकही रेल्वे स्टेशन बसच्या मार्गशी थेट जोडलेले नसल्याने रेल्वे हा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय सहज उपलब्ध होत नाही . शहरातील एकही सार्वजनिक वाहतुकीची बस MIDC मधील अंतर्गत रस्त्यावर फिरत नाही . नागरिक ज्या भागात कामाला जातात तो भाग pmpml ह्या बस सेवेत सामाविष्ट नसल्याने आज प्रत्येक कामगार आपल्या स्वतःच्या दुचाकीने कामाला जात आहेत. घरात दुचाकी व इतर वाहने उपलब्ध असताना नागरिक सुटीच्या दिवशी अथवा इतर दिवशी सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निवडत नाहीत व या सर्व गुंतागुंतीच्या अडचणी मुळे आपल्या शहरातील वाहतुकीच्या बाबतीत समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यावर एकाच वेळी अनेक वाहने एकदम येतात आणि बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी रोज पहावयास मिळते. हिंजवडी ला रोज कामाला जाणारे १४ किलोमीटरचे अंतर कापायला रोज पुरे दोन तास खर्ची घालतात. जर दोन तास गाडी सतत चालली तर ती कमीत कमी ४०ते ५० किलोमीटर चालू शकते म्हणजेच तेवढे इंधन आम्ही रोज फक्त १४ किलोमीटर साठी वापरतो व हि अवस्था जाताना व येताना दोन्ही वेळेस अनुभवावी लागते आहे , म्हणजे ह्या प्रकारात देशाच्या संपत्ती नाहक उध्वस्त करीत आहोत.
वाहतूक समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या सरकारला / शासनास हे समजावून सांगणे महत्वाचे आहे कि सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करा शहराच्या परीघा पासून वाहतूक शहराच्या मध्यबिंदू पर्यंत सगळ्या दिशेने असणे महत्वाचे आहे तसेच शहराच्या परीघावर मोठे रस्ते असणे गरजेचे आहे
आपल्याकडे BRT सुरु झाली व बंद पडली त्याठिकाणी आपण आता METRO चे मागील दोन वर्ष खांब मोजत बसलो आहोत. पिंपरीतील नागरिक १०रुपयाचे तिकीट काढून दापोडीला नदीत अंघोळ करून परत येण्यासाठी आता सोय केली आहे. मेट्रोचा उपयोग सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे का ? हा मात्र अभ्यासाचा विषय आहे. सर्वात जास्त वाहतूक भोसरी,चिंचवड,पिंपरी,ताथवडे,तळवडे,चिखली, सांगवी आणि पिंपळे सौदागर परिसरात असताना त्या भागाचा विचारच झालेला नाही . नाशिक फाटा ते भोसरी मोशी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांची प्रचंड गर्दी असते खरे पाहता नाशिक फाटा ते चाकण असा मेट्रो मार्ग असणे गरजेचे आहे. भोसरी चिखली तळवडे निगडी असा एक मार्ग हवा होता पण त्याबाबत कोणीच मागणी करीत नाही, त्यामुळेच पर्यावरणात बिघाड होत आहे.