नंदुरबार येथे खासदार हिना गावी यांची पत्रकार परीषदेत माहिती
नंदुरबार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील 547 गावांमध्ये विस्तारीत ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावित यांनी येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली. 1 जुलै ते 15 आगस्ट दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी गावनिहाय कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गावपातळीवर सेवा देणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती खासदार गावीत यांनी दिली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.कांतीलाल टाटिया उपस्थित होते.