विहिंपचे माजी प्रमुख विष्णू दालमिया यांचे निधन !

0

नवी दिल्ली- राम जन्मभूमी उभारण्यात आलेल्या चळवळीतील महत्वाचे नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख विष्णू हरी दालमिया यांचे आज बुधवारी ९१ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. एक प्रसिद्ध उद्योजक म्हणूनही त्यांची ख्याती होती. आज संध्याकाळी त्यांच्यावर निगंबोध घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

दालमिया हे श्री राम जन्मभूमी न्यासाचे ट्रस्टी तसेच विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडलचे सदस्य होते. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि गिरीराज किशोर यांच्यासोबत दालमिया यांनी राम जन्मभूमी चळवळीत महत्वाची भुमिका वठवली होती.