विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या

0

रावेर । तालुक्यातील केर्‍हाळा येथील एका 55 वर्षीय व्यक्तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत वृत्त असे की, केर्‍हाळा येथील रहिवासी रामदास लहूजी पाटील हा 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या दाभोळा वस्ती मंगळुर शिवरातील शेतात गेला आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून येथील माजी सरपंच अनिल पाटील यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस संदीप खंडाळे करीत आहे.