विहिरीत उडी घेत तरुणाने संपवले जीवन : नैराश्यातून उचचले पाऊल

A 25-year-old youth in Mahelkhedi commits suicide due to the depression of divorce यावल : तालुक्यातील महेलखेडी येथील एका 25 वर्षीय तरुणाने घटस्फोट झाल्याच्या नैराश्यातून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मे महिन्यामध्ये तरुणाचे लग्न झाल्यानंतर जुलै महिन्यात घटस्फोट होताच तरुण नैराश्येच्या गर्तेत गेल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. रहिम बिस्मिल्ला देशमुख (25, महेलखेडी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
रहिम य तरुणाचे मे महिन्यामध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर जेमतेम दोन महिने विवाहिता त्याच्याकडे नांदली व जुलै महिन्यात त्याचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यापासून तरुण नैराश्यात होता व याच नैराश्यातून त्याने महेलखेडी गावालगत असलेल्या विलास भागवत पाटील यांच्या शेत विहिरीत जाऊन उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताचं पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. याप्रकरणी अब्दुल फत्तु देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.