विहिरीत पडलेल्या बिबट्यास काढले बाहे

0

धुळे । साक्री तालुक्यातील शेवाळी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात वनविभागाला रात्री दोन वाजेच्या सुमारास यश मिळाले. त्यास अशा प्रकारे जीवदान मिळालेल्या या तीन वर्षीय बिबट्यास मंगळवारी पहाटे धुळे तालुक्यातील लळींगच्या कुरणात सोडण्यात आले. सोमवारी रात्री शेवाळी शिवारात गावापासून दोन कि.मी. अंतरावरील शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता.

रटॉर्चच्या प्रकाशात पिंजरा सोडला आत
विहिरीतील मातीच्या कठड्याचा आधार घेत बिबट्या बसलेला होता. पाण्यात भिजल्याने तो थंडीने काकडला होता. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यात सहायक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी यांच्यासह वनरक्षक भामरे, बोरसे, पाटील, वाघ, परदेशी, पठाण, खोंडे, बागुल आदींचा समावेश होता. ग्रामस्थही मोठ्या संख्येने पोहचले होते. रात्रीची वेळ असल्याने विहिरीत अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात लोखंडी पिंजरा आत सोडण्यात आला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्या त्यात शिरला. त्या नंतर हा पिंजरा वर काढण्यात आला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या बिबट्यास धुळ्याजवळील लळींगच्या जंगलात सोडून देण्यात आले.