रावेर- तालुक्यातील मोहगन शिवारातील विहिरीत पडल्याने 31 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. नजीर सीताब तडवी (31, पाडळा बु.॥) असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखलि करण्याचे काम सुरू होते. घटना नेमकी कशी घडली याबाबत सविस्तर माहिती कळू शकली नाही.