विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

0

मुंबई-भावासोबत खेळत असताना यश जिलेदार यादव या सात वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना जोगेश्‍वरी पश्‍चिमेतील आर.सी. पटेल चाळीत घडली. यश आपल्या कुटुंबासह ओशिवरा परिसरातील आर.सी. पटेल चाळ, जोगेश्वरी पश्‍चिम याठिकाणी वास्तव्यास होता. सौरभ आणि यश एकत्र खेळत होते. मात्र खेळताखेळता पापडवाला तबेला याठिकाणी ते पोहोचले असता, अचानक विहिरीजवळ यशचा पाय घसरून तो विहिरीत पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झला. यश विहिरीत पडल्यावर सौरभने ही माहिती रहिवाशांना दिली. यानंतर रहिवाशांनीही ताबडतोब विहिरीजवळ धाव घेतली. राहिवाशांनी यशला बाहेर काढून सिद्धार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.