वीजजोडणीसाठी आवश्यक तो निधी

0

मुंबई | दुष्काळग्रस्त भागात कृषीपंप वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी ऊर्जा विभागाचा आढावा घेताना दिले.

यासाठी 1105 कोटींचा प्रस्ताव विचाराधीन होता. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषीपंप वीज जोडणी आवश्यक आहे. यासाठी महावितरण कंपनीने पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी दोन लाख आठ हजार कृषीपंप पैसे भरून प्रलंबित आहेत. या प्रलंबित कृषीपंपाच्या उर्जीकरणासाठी महावितरणने निधी उभारण्याची सूचना फडणवीस यांनी केली. केंद्र पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील रस्ता पुनर्स्थापनाचे दर महानगरपालिकानिहाय आहेत. त्या दरामध्ये एकसमानता आणण्याची सूचनाही त्यांनी केली.