Anger at power cut: Yavala electricity company employee abused and beaten up यावल : व्यापारी गाळ्याचे वीज बिल थकीत झाल्यानंतर कारवाईपोटी वीज कनेक्शन कट केल्याच्या रागातून वीज कंपनीच्या तंत्रज्ञास शिविगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना शहरात बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी संशयीत प्रदीप संजय चौधरी (26, रा.मोरेवाडा, डांगपूरा, यावल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वीज कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की
वीज कंपनीचे तंत्रज्ञ महेद्र सीताराम कुरकुरे (30, रा.न्हावी ता.यावल) यांच्या फिर्यादीनुसार, यावल शहरातील प्रदीप संजय चौधरी यांनी भाडे तत्वावर के.पी.कुलकर्णी यांचा गाळा भाड्याने घेतला असून या गाळ्यातील वीज बिलाची थकबाकी वाढल्यानंतर नियमानुसार वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी वरीष्ठांच्या आदेशान्वये कट करण्यात आला मात्र कारवाईप्रसंगी संशयीत प्रदीप चौधरी याने धक्काबुक्की करीत शिविगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कुरकुरे यांच्या तक्रारीनुसार प्रदीप चौधरीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.