चोपडा। तालुक्यातील माचला येथील भिल्ल वस्तीत आज सकाळी वीजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादाभाऊ भिल (वय 7) हा जिल्हा परीषद मराठी शाळेचा पहिलीचा विद्यार्थी होता. तो सकाळी खेळत अंगणात गेल्यावर विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेत वीजप्रवाह उतरलेला असल्याने त्या तारेला त्याचा स्पर्श होताच तो शॉक लागून जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे माचला गावावर शोककळा पसरली आहे.
20 हजारांची मदत
महावितरणचे सहाय्यक अभियंता पंकज बाविस्कर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याचा आरोप केला व भरपाईची मागणी केली. त्यानंतर 24 तासांच्या आत 20 हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याचे व महावितरणच्या नियमाप्रमाणे 4 लाखांची भरपाई देण्याचे आश्वासन बाविस्कर यांनी दिले. शोभाबाई भिल यांचे सासर धामणगाव (ता.जळगाव) आहे. त्यांना तीन अपत्ये आहेत. पती व्यसनी असल्याने शोभाबाई मुलांसह माहेरी माचला येथे शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. मोठा मुलगा गोलु 10 वर्षाचा व मुलगी कालुबाई 8 वर्षाची आहे शोभाबाई 6 वर्षापासून भाऊ अर्जुन भिल यांच्याकडे आली आहे कृष्णाचा मृत्यू झाल्याने हे कुटुंब सुन्न झालेले होते.