वीज अभियंत्यास धक्काबुक्की करणारावर गुन्हा दाखल

0

नंदुरबार । वीज मीटर तपासणी गेलेल्या वीज अभियंत्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका विरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील साक्रीनाका परिसरात राहणारे पंकज चौधरी यांच्याकडे वीज मीटर तपासणीसाठी प्रदीप सावंत हे गेले होते. यावेळी चौधरी यांनी सरकारी कामात अडथळा आणून धक्काबुक्की केली, तसेच पंचनामा फाडून फेकून देण्यात आला, अशी फिर्याद अभियंता सावंत यांनी नोंदविली आहे. त्यानुसार पंकज चौधरी यांच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद आशाबाई चौधरी यांनी नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की घरात कुणी नसतांना अभियंता सावंत यांनी अश्‍लिल शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत सावंत यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस तपास करत आहेत.