भुसावळ- वीज कंपनी ठेकेदारास मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसात एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 7 रोजी घडली. वीज कंपनीचे रीडींग घेणारे ठेकेदार किशोर सुधाकर टोके (गांधी नगर, भुसावळ) यांना संशयीत आरोपी अजय पाटील (नाव, गाव पूर्ण माहित नाही) याने मोबाईल करून तुमचे लोक रीडींग व्यवस्थित घेत नाही या कारणावरून वाद घात वीज कंपनीच्या कार्यालयात येवून अधिकार्यांसमक्ष मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.