वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला वर्कर्स फेडरेशनचा विरोध !

0

सांगली: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वीज कामगार संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन सांगली येथे संघटनेचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी राज्यभरातून ७०० प्रतिनिधी उपस्थित होते. कॉ. मोहन शर्मा यांनी उद्घाटना प्रसंगी भाषणात, तिन्ही कंपन्या मध्ये खासगीकरण, कंत्राटी करण, फ्रांचाईसी करण टाळण्यासाठी लढा देण्याचे सामर्थ्य आपल्यात निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळावी. तसेच आगामी काळात लढ्यास सिध्द व्हावे ही खूणगाठ बांधली जावी हा उद्घाटनाचा मूळ मुद्दा लक्षात ठेवावा असे प्रतिपादन केले.

सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी संघटनेची निर्मिती वीज कामगार, कष्टकरी व श्रमजीवी वर्गाचे प्रतिनधित्व करणारी संघटना असून वीज कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी रात्रंदिवस जागृत्त राहून बांधील असल्याचे प्रतिपादन केले. तर सुगत गमरे यांनी वर्कर्स फेडरेशन ही संघटना वीज उद्योग मधील सर्वात जुनी, कामगार प्रश्नांची जाणीव असलेली, लढाऊ व विचारवंत सभासद पदाधिकारी निर्माण करणारी संघटना असून याची आम्हाला प्रशासन म्हणून जाणीव असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन त्रैवार्षिक अधिवेशन सांगली येथे संघटनेचे झेंडा वंदन व मानवंदना कार्यक्रम करून अधिवेशनास सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा, कार्याध्यक्ष कॉ. सी. एन. देशमुख, सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस को. महेश जोतराव, केंद्रीय पदाधिकारी चेअरमन ऑडिट कमिशन कॉ. जे. एन. बाविस्कर, संयुक्त सचिव कॉ. पी. वाय. पाटील, जळगांव झोनल सचिव वीरेंद्र पाटील, राज्यभरातून आलेले प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी उपस्थित आहे.