वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते कृति समितिची निदर्शने

0

जळगाव । वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संयुक्त कृति समितिच्यावतीने महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपनीतील एकुण 87 हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या मुलभूत व जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांसाठी अनेक निषेध सभा, आंदोलने, धरणे करण्यात आली. परंतु, प्रशासन या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करुन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कृति समितीच्या शिखर परिषद नेतृत्वने घेतलेल्या निर्णयानुसार बुधवार, 14 रोजी प्रकाशगड, मुंबई येथील मुख्यालयासमोर हजारो सभासद पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निदर्शने, धरणे आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारणार आहे. या आंदोलनात जिल्हयातील 400 ते 500 कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृती समितीचे विरेंद्रसिंग पाटील यांनी दिली आहे.

…तर संपावर जाणार
14 रोजी होणार्‍या आंदोलनानंतरही प्रशासनाने ताठर भुमिका कायम ठेवल्यास कृति समितिच्यावतीने 26 च्या मध्यरात्रीपासून ते 28 च्या मध्यरात्रीपर्यंत राज्यभरातील संपूर्ण वीज कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते 48 तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय कृति समितिच्यावतीने घेण्यात आला आहे. संप यशस्वी करण्यासाठी कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे विरेंद्रसिंग पाटील, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे प्रदिप पाटील, कामगार महासंघाचे दत्ता न्हावकर, सब ऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे पराग चौधरी, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे आर.आर. सावकारे यांनी केले आहे.

अशा आहेत मागण्या
तिन्ही कंपनीतील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपनीतीलकामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना शासनाच्या धर्तीवर विनाअट पेंशन योजना लागू करावी, महावितरणमधील फ्रन्चाईझी धोरण ताबड़तोब रद्द करून कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना विश्‍वासात घेऊन अंतर्गत सुधारणा करून परिस्थिति सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावी, महानिर्मितीचे दुरूस्ती व देखभालीच्या नावाखाली निर्मिती संच बंद ठेवुन खाजगी भांडवलदारांच्या वीज प्रंकल्पांमधून वीज विकत घेणे बंद करा, महापारेषणमधील नवीन उपकेंद्रे, वाहीन्या, टॉवर खाजगी उद्योजकांचे देखभालीखाली उभारले जात असलेले उपक्रम बंद करा व त्यांचा हस्तक्षेप थांबवा.