मुक्ताईनगर । तालुक्यातील वढोदा येथे वीज वितरण कर्मचार्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत कंपनीचे अधिकारर्यांसह कर्मचार्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भेट देऊन पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्याशी चर्चा केली. तालुक्यात गेल्या आठवड्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांवर हल्ला करणे, फोनवरुन धमकी देण्याचे तसेच मारहाणीचे प्रकार घडले. त्यासंदर्भात पोलीसांत तक्रारीही दाखल आहेत. 18 मार्च रोजी सुध्दा वढोदा येथे वायरमन विलास राऊत यांना वढोदा येथील गजानन गरुड यांनी मारहाण केली होती. याचा कर्मचार्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
हल्ल्यांमुळे कमचार्यांमध्ये पसरली दहशत
साळशिंगी-त्यातील आरोपीस अटक करण्यात आली परंतु कर्मचार्यांवर होणार्या हल्ल्यांमुळे कमचार्यांमध्ये दहशत पसरली आहे. असे प्रकार भविष्यात होऊ नये याकरीता तालुक्यातील सहा कर्मचारी संघटनांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, अभियंत्यांशी चर्चा केली. त्यानंतर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत पाटील, उपअभियंता सुहास चौधरी यांसह मागासवर्गीय संघटनेचे झोन अध्यक्ष एस.एच. गुरचळ, उपाध्यक्ष शंकर गोरे, वर्कर्स फेडरेशनचे सचिव रमेश निकम, मागासवर्गीय संघटनेचे बी.यु. पानपाटील, कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अभिमन्यू घोगरे, सचिव सचिन पाटील, सहसचिव जी.वाय. जोशी, संघटक व्ही.एन. वडनेरे, एन.बी. पाटील, व्ही.आर. बोंडे तसेच इतरही कर्मचारी उपस्थित होते. यासंदर्भात पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात कर्मचार्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही. व दोषींवर कारवाई चालूच राहील असे आश्वासन दिले.