वीज कर्मचाऱ्यांनी वाढविली आंदोलनाची तीव्रता
पालक मंत्र्यांना निवेदन दिले व कार्यालयीन व्हॉट्सऍप गृप सोडले.
महवितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील प्रमुख सहा संघटनाच्या संयुक्त कृती समितीने प्रशासनाला दिलेल्या नोटिस नुसार विविध मागण्यांसाठी सोमवार दि 24.05.2021 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केलेले असून प्रमुख मागण्या मान्य केल्या जात नाहित तोपर्यंत लढा सुरुच ठेवला आहे. कृती समिती टप्प्या टप्प्यानेआंदोलनाची तीव्रता वाढवत असून पाचव्या दिवशी जिल्ह्याचे पालक मंत्री तथा सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांना तसेच सर्व आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन व्हॉट्सऍप गृप सोडले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्यातून सुमारे १२००० सभासदनीं ऊर्जामंत्री, वीज कंपन्यांचे संचालक, सर्व प्रादेशिक संचालकांना तसेच मुख्य औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांना ईमेल पाठवून मागण्या मान्य करण्याची विनंती केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वीज कर्मच-यांनी कार्यालयीन वेळेत काळ्या फिती लावून कार्यालयात हजर राहून सामजिक बांधिलकी जपत केवळ अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा अखंडित चालू ठेवणे, कोविड हॉस्पिटल व त्या संदर्भातील माहिती देणे या कामाव्यतीरीक्त इतर सर्व कामे बेमुदत बंद ठेवली आहेत.
पालक मंत्र्यांना निवेदन देतांना सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सहसचिव वाय. सी. भंगाळे, सर्कल सचिव देवेंद्र भंगाळे, सुहास चौधरी, नितीन चौधरी, विभागीय सचिव मिलिंद इंगळे, मोहन भोई, हर्षल नेहेते, वर्कर्स फेडरेशनचे वीरेंद्रसींग पाटील, जे. एन. बाविस्कर, पी. वाय. पाटील, नाना पाटील, तांत्रिक कामगार संघटनेचे आर. आर. सावकारे, भरतरीनाथ अनुसे, विजय मराठे, कामगार महासंघाचे ज्ञानेश्वर पाटील, चतुर सैंदाणे, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे प्रदिप पाटील आदी उपस्थित होते.