वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण मंचची सुविधा

0

नंदुरबार । वीज ग्राहकांच्या तक्रारी मांडण्यासाठी तक्रार निवारण मंच उपलब्ध करून देण्यात आला असून त्याद्वारे वीज संबंधित कोणतीही तक्रार मिटवण्यात येईल, या मंचाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्युत लोकपाल आर.डी. संके यांनी पत्रकार परिषदेत केले. वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी ते नंदुरबार येथे आले होते. वीज ग्राकांच्या असंख्य तक्रारी असतात,पण त्या मांडता येत नाही. यासाठी तक्रार सोडवण्याकरिता मंच स्थापन करण्यात आला आहे. या मंचात वीज संबंधित कोणतीही तक्रार ग्राहकांनी मांडाव्यात. यावर दोन महिन्यांच्या आत निरासन करण्यात येणार आहे. यामंचात न्याय नाही मिळाला तर वीज लोकपाला कडे तक्रार करावी, असे आवाहन लोकपाल संके यांनी केले आहे.

14 लाखांचा दंड वसूल
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना स्थानिक वीजाधिकारी म्हणाले की,शहरात 34 टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. याच प्रमाणे ग्राहकांच्या घरी जाऊन मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात 100 ग्राहकांकडे मीटरमध्ये फेरफार आढळून आल्याने त्यांच्याकडुन 14 लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. उशिरा येत असलेल्या वीज बिलांबाबत ते म्हणाले की नागरिकांनी मोबाईल कनेकक्ट करून घ्यावा, जेणे करून बिलाची सूचना त्यात देता येईल.