वीज चोरांविरोधात महावितरणची ठिकठिकाणी धडक कारवाई

0

जळगाव । तोट्यात आलेल्या महावितरणला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वीजचोरी रोखण्यासह वसुली शिवाय पर्याय नसल्याचे महावितरण अधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे. यामुळे वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत शहरासह जिल्हाभरात वीजचोरी विरुद्ध मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली. उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. परिणामी उपलब्ध वीज मागणी याची सांगड घालून भारनियमनाचे गणित करावे लागत आहे. यातच कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. यावर पर्याय म्हणून उन्हाळ्यात वीजचोरी रोखण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी महावितरण प्रशासनाने नियोजन केले आहे.