वीज चोरी करणार्‍यांवर धडक कारवाई

0

जळगाव प्रतिनिधी । महावितरणतर्फे आजपासून वीज चोरी करणार्‍यांवर धडक कारवाईस प्रारंभ होणार आहे.

शहरामध्ये वीजचोरी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. यात आकड्यांसह रिमोटद्वारे चोरी करणार्‍यांविरोधात महावितरण १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबवित आहे. संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणार्‍या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीजचोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणार्‍यांना वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येणार असून माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.