वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी भरत पाटील

0

भुसावळ । महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेची नुकतीच सर्कल कार्यकारीणीची निवड करण्यात आली. सर्कल अध्यक्षपदी भरत पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, सचिव किरण बोरोले, सहसचिव अनिल वानखेडे, श्रीराम राठोड, कोषाध्यक्ष गिरीष पाटील, संघटक संदीप धनगर, सुपडू पवार, प्रसिध्दी प्रमुख पांडूरंग गाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे झोन पदाधिकारी अतुल कदम, अविनाश जाधव, शशिकांत खोर, संजय देसाई, विकास पाटील, सचिन नाकाडे, संजय पाटील, व्ही.टी. जाधव, बालाजी तागड आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेची विचारधारा व कामगारांच्या प्रश्‍नांच्या सोडवणूकीच्या धडाक्यामुळे संघटनेत बहुसंख्यय कर्मचारी संघटनेत सामील होत असल्याचे संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.