वीज तार पडल्याने म्हशीसह गायीचा मृत्यू

0

वरणगाव। जवळच असलेल्या गोळेेगाव बु.॥ शिवारातील वीज वाहिनीचे तार म्हशीसह गाईच्या अंकावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 22 रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. या घटनेत सुदैवाने शेतकर्याचे कुटुंब बचावले. या घटनेमुळे शेतकर्याचे सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी करण्यात आली.

वीज कंपनीकडून भरपाईची मागणी
शेतकरी लक्ष्मण ओंकार सरोदे (आंचेगाव) हे गोळेगाव बुदूक शिवार गट नंबर 31 हे शेतात गुरे चराईसाठी गेल्यानंतर मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास एलटी वीज वाहक वाहिनीवरील तार गुरांच्या अंगावर पडल्याने मुर्हा जातीची 80 हजार रुपये किंमतीची म्हैस व 40 हजार रुपये किंमतीची जरशी गाय जागीच मृत झाली तर शेतकरी लक्ष्मण सरोदे यांचे कुटुंब मात्र बालंबाल बचावले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राणे यांनी पंचनामा केला. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍याने केली आहे. वरणगाव पोलिसात याबाबत नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.