वीज बिल माफीसह समस्या सुटण्यासाठी रावेरात मोर्चा

0
रावेर : फसवी कृषी संजीवनी योजना त्वरीत बंद करुन शेतकरी बांधवांना संपूर्ण वीज बील माफ करावे यासह विजेसंदर्भातील विविध समस्या सुटाव्यात या मागणीसाठी शुक्रवारी रावेर तालुका शिवसेना, युवा सेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने शहर दुमदुमले.
छोरीया मार्केटपासून मोर्चास सुरवात झाली. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा उपप्रमुख  प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवा सेना जिल्हा युवाधिकारी अविनाश पाटील,  तालुका युवाधिकारी प्रवीण पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, युवासेनेतर्फे निघालेला धडक मोर्चा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.