भुसावळात महिला संतप्त ; वीज कंपनीच्या कारभाराविरुद्ध टिका
भुसावळ- वाढीव वीज बिलांच्या शॉकमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी शहरातील खाचणे हॉल परीसरात बुधवारी सकाळी वीज बिलांची होळी करून वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने शहरवासी आधीच त्रस्त असताना वाढीव वीज बिले मिळत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. वीज न भरल्यास वीज कंपनीकडून तातडीने वीजपुरवठा खंडित केला जातो शिवाय जोडणीसाठी 118 रुपये अतिरीक्त शुल्क आकारले जात असल्याने वीज ग्राहक या प्रकाराला कंटाळले आहेत.
तर तीव्र आंदोलन
वीज कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करण्यासह ठरवलेल्या तारखेला मीटरचे रीडींग घ्यावे व रास्त वीज बिल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहरातील वीज ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान, वीज बिलांच्या होळी प्रसंगी सखी श्रावणी महिला बहुउद्देयीय संस्थेच्या मनिषा वानखेडे, भाग्यश्री नेवे, माया चौधरी, नीलिमा चौधरी, कामिनी नेवे, राजश्री वाणी, अर्चना इंगळे, उषा राणे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.