वीज बिल भरण्याच्या नावाखाली बनावट लिंकद्वारे चार लाखांचा गंडा !

Extortion of four lakhs through fake link in the name of paying electricity! जळगाव : तुम्ही ऑनलाईन वीज बिल भरत असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंकद्वारे जळगावातील एकाला चार लाखात गंडवण्यात आले. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट लिंकद्वारे गंडवले
जगदीश प्रीतमदास जेठवाणी (वय-40) रा. वैभव कॉलनी, गणपती नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 ते 7 वाजेदरम्यान, त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून व्हॉअसअ‍ॅप मॅसेज आला. वीज बिल भरण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जगदीश जेठवाणी यांनी दिलेल्या नंबरवर कॉल केला असता आपण ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याचे सांगितले. वीज बिल भरण्याचे सांगून जेठवाणी यांच्या मोबाईलवर बनावट लिंक पाठविली. दिलेल्या लिंकच्या माध्यमातून बँकेचे डिटेल्स घेवून त्यांच्या खात्यातून परस्पर 3 लाख 96 हजार 609 रूपये वळविण्यात आले.

अखेर पोलिसात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगदीश जेठवाणी यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गुरूवार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.