वीज मंडळांचे प्रताप; 38 अब्जाचे पाठविले बिल

0

जमशेदपूर : प्रशासकीय मुर्खपणाच्या अतिरेकाची उदाहरणे अनेक असतात. तसेच एक मासलेवाईक उदाहरण वीज बीलाविषयी आहे. झारखंडमधील जमशेदपूरमध्ये बी. आर. गुहा नामक व्यक्तीला ३८ अरब वीज बील आलेले आहे. वीज मंडळाचे अधिकारी इतके कर्तव्य तत्पर की त्यांनी इतकी मोठी रक्कम असूनही ती न भरल्याचा अपराध सहन होऊन गुहा यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार गुहा यांच्या घरात तीन पंखे, तीन ट्यूबलाईट आणि एक टीव्ही आहे. वीज मंडळाच्या अशा लिलांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. मूर्खपणाचा कळस म्हणजे वीज बीलात बदल न करता वीज जोडणी कापली जात आहे. आता वीज मंडळाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २०१४ मध्ये हरयाणातील पानवाल्याला १३२ कोटी बिल आले होते.