साक्री। राज्यातील विज उद्योगाचा मोठा संघर्षशील प्रवास चालू असून विजचोरी रोखणे हे मोठे आव्हान सरकार समोर आहे. मोठ्या प्रमाणात तोट्यात चाललेल्या विज उद्योगाला वाचविण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न शासन दरबारी चालू आहेत. विजचोरी रोखणे, गळती रोखणे, ग्राहकाभिमुख सेवा देणे, सेवेचा दर्जा उच्यतम करणे, आदि कारणांमुळे आता महावितरण कंपनीत नव्याने चार सनदी अधिकारी सहव्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त करून उपप्रादेशिक विभाग संभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे.
साक्री जि. धुळे येथील मोरया हॉटेल वर कार्यवाही करण्यात आली आहे. विज मीटरमधे फेरफार करुण विज चोरी केली व महावितरण कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी राजेंद्र साळवे (रा.साक्री) यांनी विजमीटर मधे रिमोटद्वारे मीटर चालू बंद करुण विज कंपनीची 2354 यूनिट विजचोरी केल्याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशन येथे शहर अभियंता सोनलकुमार नागरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनिश्री. पवार हे करीत आहेत. यापुढे ही मोहीम अतिशीघ्र करणार असून विजचोरी करणार्यासह विजमीटर मधे फेरफार करणारे व रिमोट बनवून देणारे, महावितरण कंपनीचे हेतुपुरस्कर नुकसान करणारे यांचा कसुन शोध चालू आहे.त्याद्वारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जोरात चालू असून अशा अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष मोहीम सुरू
जळगाव परिमंडळ हे औरंगाबाद उपप्रादेशीक विभागात मोडते. त्याद्वारे नवनियुक्त सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशान्वये व मुख्य अभियंता ब्रिजपालसिह जनवीर, अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या मार्गदर्शनात विजचोरी करणार्यांसह विजमीटर मधे फेरफार करणारे व रिमोट तयार करुण विकणारे यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहीमेत अतिशीघ्र कार्यवाही केली जात आहे.