वीज वितरणची वहन आकाराच्या नावाखाली दरवाढ

0

भुसावळ । डिसेंबर-जानेवारी महिन्यात आलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या देयकामध्ये बारकाईने वाचन केले असता, सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे. वहन आकार 1.18 रुपये राज्य विद्युत नियामक आयोगाने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची आर्थिक लूट भेट दिलेली आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने प्रथमच वीजदरातील अस्थिर आकारांची विभागणी केल्याने वहन आकार स्वतंत्रपणे दाखविण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून लागू झाले नवीन दर
विद्युत नियामक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाप्रमाणे घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ झालेली आहे. हे दर 1 नोव्हेंबर 2016 पासून लागू झाले असून नव्या वीजदरात वहन आकार प्रथमच वेगळा दाखविला आहे. पहिल्या 100 युनिटसाठी असलेला घरगुती वीजदर पाहिल्यास वीज आकार 2.98 रुपये अधिक वहन आकार 1.18 रुपये, असा एकूण 4.16 रुपये अस्थिर वीज आकार आहे. यातील वहन आकार नवीन नाही, तर तो वीजदराचाच एक भाग आहे. जनतेला तर वाढीव रकमेचा फटका बसलेला आहे.

ग्राहकांना दरवाढ परवडेना
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेला हा अचानक वाढलेला भार परवडणारा नाही. शेतकरी व सर्वसामान्यांवर अन्यायकारक कर वाढ आहे. आधीच उच्च अधिक दाबाने विज पंप वारंवार खराब होतो त्यात विज बिल जास्त, उत्पन्न कमी त्यामुळे सर्वसामान्यांचा संताप व्यक्त होत आहे. विज वितरणच्या ग्राहकांनासुद्धा ही अचानक केलेली आपणास परवडणारी नाही. वीजदर निश्चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. महाराष्ट्र शासनाने या विषयी हस्तक्षेप करावा.