वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची लूट

0

वरणगावला ग्राहक तक्रार दिनी अनेक तक्रारी

वरणगाव– उपविभागीय वीज वितरण कार्यालयात ग्राहक तक्रार दिनानिमित्त वीज ग्राहकांनी अनेक तक्रारी अधिकार्‍यांसमोर मांडल्या. वीज कंपनी ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप करण्यात आला. वीज वितरण कार्यालयामध्ये ग्राहक संरक्षण कक्षाचे वरणगाव शहराध्यक्ष डिगंबर चौधरी, रवींद्र सुतार, चंद्रकांत शर्मा, शिवा भोई, प्रवीण कोळी, मोहन धनगर, निलेश ठाकुर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी ग्राहकांच्या वाढीव बिलाबाबत तसेच मुदतीत रिडींग घेण्याबाबत तक्रारी उप अभियंता जे.एस.महाजन यांच्यासमोर मांडल्या. तक्रारीची दखल घेत काही बिलांमध्ये आकारणी कमी करण्यात आली परंतु रिंडीगनुसार बिलात आकारणी कमी न केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.