वीज कपातीमुळे शेतकरी हवालदील ; जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक
नंदुरबार- वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने वीज कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांनी केले. परतीच्या पावसाने धोका दिल्यामूळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. त्यातच वीज कंपनीने वीज कपात करून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. शेतकर्यांना वीज पुरवठा वाढवुन देण्यात यावा, या मागणीसाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी नंदुरबार येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करून निषेध नोंदवला, फसवी कर्जमाफी, वाढीव विज बिल, महागाई ,बोकाळलेला भ्रष्टाचार, या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे सर्वत्र आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वीज वितरण कंपनी समोर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यात नंदुरबार विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहित सिंग राजपूत, महासचिव अर्जुन सिंग राणा, अविनाश माळी, ललित पाटील, जगदीश् वसईकर, जयेश वराडे ,वाल्मीक राजपूत, मुकेश सोनवणे, अमरसिंग वळवी, साई कुमार गावित ,उमरखान, गौरव पाटील, स्वप्नील पाटील ,योगेश बारी, पिंटू पिंजारी ,सोनू वराडे, रोशन पाटील, योगेश राजपूत, कृष्णा कुमार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,