वरणगाव । येथील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेवरील 60 लाखांच्यावर मागील थकबाकी असल्याने विजवीतरण कंपनीने चार गावांना पाणीपुरवठा करणारी योजनेवरील विजपुरवठा 2 मार्च रोजी विजखंडीत केला होता. सोमवार 6 रोजी सकाळी 11 वाजता वरणगाव शहरातील वीज वितरण कार्यालयावर चार गावांच्या ग्रामस्थांनी मोर्चाच्या दणक्यानंतर विजपुरवठा झाला सुरळीत करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर विजपुरवठा खंडीत झाल्याने गावकरी त्रस्त झाले होते. यामुळे सोमवार 6 रोजी सकाळी 11 वाजता महामार्गालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर 100 च्या वर ग्रामस्थांनी कार्यालयात जावून अधिकार्यांसह कर्मचार्यांना कोंडून घेतले.
आंदोलनाच्या भितीने विज पुरवठा सुरळीत
यामुळे खळबळून जागे झालेल्या विज वितरण कंपनीने तपत कठोरा येथील विजपुरवठा सुरळीत केला. फुलगाव, अंजनसोंडे, तपतकठोरा या चार गावांचा सामुहिक पाणीपुरवठा या गावांना होतो. या योजनेवरील वीज बील थकीत झाल्यामुळे विज वितरण कंपनीने 2 रोजी विजखंडीत केला होता. यामुळे या चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजकुमार चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, फुलगाव सरपंच ललीता महाजन यांनी जळगाव जिल्हा परिषदचे मुख्यधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेवून सदरचा प्रकार सांगीतला असता तपतकठोरा येथील सामुहीक पाणीपुरवठयाचे थकीत असलेले विज बील भरण्याची अमादी केली. याबाबत शुक्रवारी विज वितरण कंपनीला आठ दिवसात विजबिल भरण्याचे हमीपत्र दिले.परंतु विज वितरण कंपनीने विजपुरवठा सुरळीत न केल्यामुळे सोमवार 6 रोजी विज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले असता वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय दिलीप गागुर्डे, पीएसआय निलेश वाघ यांनी जिल्हा परिषद विभागाशी संपर्क साधून आंदोलन सोडले. यानंतर गावकर्यांनी आपला मोर्चा दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राकडे ओळवीला फुलगाव येथे नवीन पाणी पुरवठा योजना करण्यासाठी सीएसआर या योजनेंतर्गत फुलगाव सामुहिक पाणी योजना करण्यात येईल असे आश्वास न औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक अभियता एन.बी. मिश्राम यांनी सांगीतले होते. मात्र या योजनेकडे औष्णिक विद्युत केंद्राचे दुर्लक्ष झाल्याचे समजते. या मोर्चात विलास महाजन, सदाशिव भिल, संजय पाटील, हरी टाकोळे, रामराव पाटील, देवानंद सोनवणे, धनराज कोळी, दिपक कोलते, रोशन चौधरी, धनराज कंडारी, प्रमोद इंगळे, भूषण महाजन, नंदलाल गुरचळ, रेतीश शिंदे, हर्षल कोळी, ज्ञानेश्वर कोळी, नितीन भालेराव आदी 100च्यावर ग्रामस्थ मोर्चात सहभागी होते.