वीट पडल्याने महिलेस मारहाण

0

देहुरोड : किरकोळ कारणावरुन महिलेला दोघांनी मारहाण केली आहे. ही घटना शेलारवाडी येथे दुपारी सव्वा चार वाजता घडली.
याप्रकरणी संगिता अशोक भेगडे (वय 45, रा. शेलारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश दत्तात्रय भेगडे व त्याचा साथीदार यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी कपड्यांवर ठेवलेली वीट आरोपीच्या अंगणात पडली. ही वीट त्या घेण्यास गेल्या असता आमच्या वीटा का चोरून नेता, अशी विचारणा केली. तसेच त्यांना मारहाण व शिवीगाळ केली. यावरून गणेश भेगडे याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलिसांनी गणेशला अटक केली आहे.