चेन्नई: विख्यात चंदन तस्कर वीरप्पन यांची मुलगी विद्या राणी याने भाजपात प्रवेश केला आहे. भाजप नेते मुरलीधर राव, पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत वीरप्पनच्या मुलीने भाजपात प्रवेश केला आहे. विद्या राणी तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय आहे.
विख्यात चंदन तस्कर म्हणून वीरप्पनची ओळख होती. त्याला मारण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या होत्या. वीरप्पनच्या जीवनावर चित्रपट देखील निघाले. तामिळनाडू आणि केरळ राज्यात वीरप्पनची दहशत होती. तब्बल २० वर्ष पोलिसांनी वीरप्पनचा शोध घेतला. अखेर त्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले.