पुणे । राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंना घडविणार्या माताही तितकीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. अशा 21 खेळाडू्ंच्या मातांचा सन्मान क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या वतीने वीरमाता जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, विद्याधर अनास्कर, अॅड. सुभाष मोहिते, संजय लेले, मिलिंद काळे, क्रीडा भारती पुणेचे अध्यक्ष शैलेश आपटे, विजय रजपूत, प्रदीप अष्टपुत्रे, शकुंतला खटावकर, उमेश बिबवे, चिन्मय खरे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.