जळगाव । वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनाच्या निमीत्ताने शहरातील बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छता करण्यात आली. 1 जून गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता हिंदू जनजागृति समितीच्या रणरागिणी शाखेच्या खादेशमाहेर वासिन झाशीच्या राणीचे अभिषेक करून पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले. रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी जयतु जयतु हिंदू राष्ट्र, अशा प्रकारच्या जोरदार घोषणांनी बेंडाळे चौक दणाणून गेला. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला होता.
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सज्ज व्हा
हिंदू जनजागृति समितीच्या रणरागिणीच्या शाखेच्या वतीने वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या बलीदानदिनाच्या निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात रागेश्री देशपांडे यांनी सांगितले की, हिंदू भगिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सज्ज रहायला हवे. कुणाच्याही सहाय्याची अपेक्षा न ठेवता आत्मबळ वाढवायला हवे, त्यासाठी राणी लक्षमीबाईंचा ज्वलंत आदर्श आपल्यासमोर आहे त्यांच्या बलीदानदिनी त्यांना विनम्र अभिवादन करुन स्वत;तील आत्मतेज वाढविण्याचा प्रयत्न करायला हवा. या वेळी सौख्या चौधरी, रागेश्री देशपांडे, मिनाक्षी तांबट, स्वाती तांबट, मंगला तांबट,रुचीका जाधव, तेजस्वीनी तांबट आणि सोनीका पोळ यांची उपस्थिती होती.