भीमपुरा । पुणे कन्टोन्मेंट बोर्ड तर्फे चालविण्यात येणारी भीमपुरा येथील वीर सावरकर शाळा गेल्या 15 हून अधिक वर्षापासून बंद पडली होती. तिच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खासदार अनिल शिरोळे व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी पार पडला.
2.54 कोटी रुपये खर्चून शाळेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. 18 महिन्यात शाळेचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे कुंभार बावडी, पहाडी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच शिक्षणाची सोय उपलब्ध होणार असल्याचे शिरोळे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. शाळेत इंग्लिश मिडीयमबरोबरच ई लर्निंग, स्मार्ट क्लासेस व ई-लायब्ररीच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, प्रमुख संचालक एल के पेगू, सदस्य दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला, रूपाली बीडकर, किरण मंत्री, प्रियंका श्रीगिरी आदि उपस्थित होते. दाट वस्ती मधील शाळा बंद पडल्यामुळे मुलांना दुसर्या शाळेत जावे लागत होते.