तळोद । बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याचे पहिल्याच पावसात तीन तेरा झाल्याने रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याचे पहिल्याच पावसात सिध्द झाले आहे.याबाबत संबधित विभाग काय कार्यवाही संबधित ठेकेदारावर करते याकडे लक्ष लागले आहे.जुनच्या पाहिल्याच आठवडयात तळोदा- अक्कलकुवा वळणरस्त्यापासून सोमावल गावाच्या पुढे पर्यत रस्त्याचे काम करण्यात आले आहे या ररत्यावर पूर्वीखडे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेला मुरुम योग्य रीतीने साफ न करण्यात आल्याने व ररत्यावर डांबरीकरण करताना खडडे योग्य रितीने बुझण्यात आली नाहीत त्यामुळे पाहिल्या पावसात बुधावली ते लोभाणी दरम्यान रस्त्यावर काही ठीकाणी मुरुम वरती येवून खड़े पडले आहेत तर काहीं ठिकाणी रस्ता दाबला जावून खडडे पडले आहेत.यामुळे केवळ विस दिवसात रस्त्याचे तीन तेरा झालेत.