श्रीवर्धन । श्रीवर्धनमधील तरुणांनी वी नेचर फ्रेन्ड्स या संस्थेच्या माध्यमातून वन्यप्राणी बचावाची मोहीम राबवत आहे. तरुणांची ही संस्था 2008 साली स्थापन झाली. विविध जातींचे साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम संस्थेचे सभासद करत. सापांसोबत अन्य वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचा वसा संस्थेने जोपासला. आजपयर्ंत 980 साप व तस्यम जातींच्या वन्यजीवाना अभय देण्याचे काम केले. संस्थेचे कार्य क्षेत्र श्रीवर्धन म्हसळा तालुका व गोरेगाव येथे आहे. संस्थेची सभासद संख्या 15 आहे.
संस्थेला सरकारी मानधन काहीच मिळत नाही. संस्था निःशुल्क कार्य करते वन्यजीवमधील गिधाड, संवर्धनाला संस्थे कडून प्रोत्साहन दिले जाते समाजात वन्यजीव विषयी प्रेम निर्माण व्हावे व समाजातील त्यांच्या विषयीचे गैरसमज दूर व्हावे यासाठी शाळा व कॉलेजमध्ये संस्था विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. सापाच्या विविध जाती शालेय मुलांना कार्यक्रमात दाखवल्या जातात. त्याविषयी सखोल ज्ञान त्यांना दिले जाते. मगरीसारख्या खतरनाक प्राण्यांस पकडण्याचे व सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम संस्था करते. समाजात आदर्श निर्माण करत ठीक ठिकाणी वृक्षरोपणाच्या विविध मोहिमा आयोजित केल्या जातात. श्रीवर्धन वन विभागास वी नेचर फ्रेन्ड्स सदैव मदत करते. श्रीवर्धन तालुक्यातील खेडे गावातील विविध वन्यजीव संबंधित समस्या सोडवण्याच्या कामी संस्था अग्रणी असते. फुरसे, नाग, समुद्री साप, मांजर्या, अजगर, धामण, गवत्या दिवड, कवड्या या विविध जातीचे साप श्रीवर्धन तालुक्यात निदर्शनास येतात. त्यासाठी वी नेचर फ्रेन्ड्स महत्त्वाची भूमिका बजावते.
वन्यजीवाचे रक्षण काळाची गरज
श्रीवर्धन शहर ग्रीन झोन आहे तरीसुध्दा बिल्डर शाहीचा उदय झाल्याने शहरात सिमेंटचे जंगल वाढत आहे. साप नारळ पोकळीच्या बागा सोडून मानवी घरचा आश्रय घेण्यात धन्यता मानतात. श्रीवर्धन सरकारी दवाखान्यात दररोज साप चावलेले रुग्ण उपचारांसाठी दाखल झाल्याचे निदर्शनास येते. वन्यजीवाचे रक्षण काळाची गरज आहे परंतु मानवी जीवनास अनन्य साधारण महत्व आहे. तरुणांच्या या संस्थेस सरकार ने योग्य सहकार्य केल्यास सामाजिक आरोग्य चांगले राहील. तसेच तरुणांच्या मनाला नवी उभारी येईल. असे सर्पमित्र अनिरुद्ध नागवेकर यांनी सांगितले.