पिंपरी-चिंचवड । निगडी, यमुनानगरात असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित शिशू विद्यामंदिराच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली होती. लहान मुलांना निसर्गातील विविध वनस्पतींचे महत्त्व समजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पालकसंघाचे उपाध्यक्ष कांतीलाल दणाणे यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचे पूजन करण्यात आले. प्रत्येकाने एकतरी झाड लावावे, असे आवाहन मुलांनी केले. वर्गात, घरी, शाळेच्या आवारात तसेच रस्त्यावर कुठेही कचरा टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा मुलांकडून म्हणून घेण्यात आली. यावेळी पालकसंघाचे सचिव श्रीकृष्ण पादीर, गोरोबा शेळके, माजी मुख्याध्यापिका रजनी जाधव, मुख्याध्यापिका संगीता घुले, सुरेखा मुणगेकर उपस्थित होत्या.