घाटकोपर (निलेश मोरे): गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने झालेली वृक्षतोड त्यामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. वृक्षतोडीमुळे पर्जन्यमानात झालेले बदल, आटलेल्या विहिरी, तलाव, नद्या यामुळे दुष्काळासारखी परिस्थिती मागील काही वर्षांमध्ये अनुभवायला मिळाली. पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी वृक्षलागवड आवश्यक आहे. 1 जुलै हा जरी जागतिक पर्यावरण दिवस शासनाच्या माध्यमातून साजरा होत असला तरी या वृक्षरोपण मोहिमेत जनतेचा सहभाग असणे आवश्यक असल्याचं मत परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी आज दिनांक 1 जुलै 2017 रोजी भटवाडी येथील फायरिंग रेंज मैदानात घाटकोपर चिरागनगर पोलिसां तर्फे आयोजित केलेल्या वनमहोत्सव कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना केले. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी अप्पर पोलीस आयुक्त लखमी गौतम, पोलीस उपायुक्त सचिन पाटील, व.पो.नि व्यंकट पाटील आदी उपस्थित होते.