जळगाव । शासनातर्फे 4 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्भारित करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने जळगाव जिल्हयात होणारे 20 लाख 89 हजार वृक्ष लागवडीवर लक्ष ठेवण्यासाठी 345 समन्वयक नेमण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकरांनी पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्याला दिलेले उद्दीष्ट गाठण्यासाठी जिल्हयातील शासकिय, निमशासकिय यंत्रणा,सामाजिक संस्था, महाविद्यालय, शाळा, सेवाभावी संस्था, सर्व नगरपालिका, ग्रामपंचायत यांना समाविष्ठ करण्यात आले आहे. 1153 ग्रामपंचायतींना प्रति ग्रा.प. 375 रोपे प्रमाणे 4.31 लाख रोपांचा मोफत पुरवठा वन विभागामार्फेत सुरू आहे. या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर 45 तर तालुकास्तरावर 290 समन्वयकांची नेमणूक करण्यात आली.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाविषयी वनविभागाच्या संकेतस्थळावर हरीत सेना नोंदणी करून सभासद होता येणार आहे.जिल्हयात 52 हजार हरीत सेना नोंदणी करण्यात आली आहे. कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लाववीत याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे प्रशिक्षणसुध्दा देण्यात आले आहे. वृक्षलागवडीची ऑन लाईन नोंदणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते. 23 लाख 66 हजार झाडे लावण्याचे प्रस्तावित असून वृक्ष लागवडी नंतर त्याचे ऑन लाईन नोंदणी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या कार्यालयात होणार आहे.जिल्हयातील 34 रोपवाटिकांमध्ये निम, शिरस, चिंच,गुलमोहर, काशिद, आवळा, बाभूळ, आंबा, करंज, बांबू, पिंपळ, कांचण, अंजन, शिसू, बेहाडा, बेल, पेल्टोफोरम, सिताफळ, बोर, कविट, पापडा, हीरडा या प्रकारची 41 लाख 17 हजार झाडे उपलब्ध आहे.