भुसावळ । राज्य शासनाच्या धोरणानुसार 4 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला.
आंबेडकर विद्यालय
कंडारी येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयात वृक्षारोपण मोहिमेंर्तगत संस्थाध्यक्ष एस.पी. सपकाळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. चौधरी, माध्यमिक मुख्याध्यापक गजानन इंगोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी संस्थाध्यक्ष एस.पी. सपकाळे, प्रभारी मुख्याध्यापक एस.पी. चौधरी यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रांत व पोलीस प्रशासन
प्रांत व पोलीस प्रशासनातर्फे जुन्या तहसिल कार्यालयाच्या परिसरात सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी तहसिलदार मिनाक्षी राठोड, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांसह इतरही अधिकार्यांची उपस्थिती होती. यानंतर तहसिल कार्यालयाच्या आवारात तहसिलदारांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी नायब तहसिलदार व तलाठी उपस्थित होते.
कोटेचा महिला महाविद्यालय
महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे सल्लागार जयंतीलाल सुराणा, कोषाध्यक्ष राधेश्याम लाहोटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. जे.व्ही. धांडे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह प्राचार्या तसेच उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पाटील, उपप्राचार्य प्रा. जे.व्ही. धनविज, पर्यवेक्षक प्रा. आर.बी. भदाणे, कार्यक्रमाधिकारी प्रा. माधुरी भुतडा व विद्यार्थीनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रा. एस.डी. वंजारी, प्रा. वाय.डी. देसले यांनी परिश्रम घेतले.
वरणगाव शहरात वृक्षारोपण
येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील आयुध निर्माणी रस्त्यावरील मुस्लीम कब्रस्थानच्या जागेत व नाथ शाळेजवळील बुध्द विवाहाराच्या जागेत तसेच मंकरदनगर मध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपनगराध्यक्ष शेख अरवलाक, नगरसेवक सुधाकर जावळे, राजेंद्र चौधरी, रविंद्र सोनवणे, इरफान पिंजारी, साजीद कुरेशी, नगरसेवीका रोहिणी जावळे, माला मेढे, वैशाली देशमुख, संभाजी देशमुख, गंभीर कोळी, राजु गायकवाड, संजय माळी, गोमा भोई, गौतम इंगळे, रिंकु इंगळे, संतोष धनगर, खंडू धनगर आदी नगरसेवक व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फुलगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून सरपंच ललिता महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार चौधरी, ग्रामसेवक के.ए. भंगाळे, मुख्याध्यापक, शिक्षक, कृषीदुत योगेश कदम, रुपेश कांबळे, अमोल कासार, शुभम पाटील, सुरज म्हस्के, अजय पांढरे, आदिल पठाण आदी उपस्थित होते.