वृक्षवल्ली आम्हा सोयरे… चिमुकल्यांनी झाडांना राखी बांधून जि. प. वैजाली शाळेत सामुहिक रक्षाबंधन

शहादा दि. 29 प्रतिनिधी– प्रकाशा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे सामुहिक रक्षा बंधन भारतीय संस्कृतीचा भाऊ- बहिणीचा पवित्र सन म्हणजे ‘ रक्षाबंधन’ भाऊ- बहिणीचे प्रेम घट्ट करणा धागा म्हणजे राखी. या सणाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक सुदाम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सर्जनशीलता दाखवत स्वतः आनंदाने राख्या बनवल्या तसेच मुलांना त्यांच्या आवडीच्या रंगाच्या राख्या बांधत शाळेमध्ये उत्साहात राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून झाडांना राखी बांधून सणांचे महत्व पटवून देण्यात आले. या सर्व राख्या टाकाऊ वस्तूंपासून मुलांनी पालकांच्या मदतीने तयार केल्या आहेत. यातील काही राख्या झाडांना बांधण्यात आल्या. झाड आपणाला आक्सिजन, सावली, फळे, फुले देते पण तोच खरा माणसाचा आधार आहे. याची जाणीव ठेऊन आम्ही झाडालाच भाऊ समजून राखी बांधली असं या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं.निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना झाडांना राखी बांधली शाळेच्या चिमुकल्यांनी अनोखी रक्षाबंधन साजरी केली आहे. “झाड आपलं रक्षण करते, आपणाला खाऊ देते, सावली देते आाता आपणही झाडांचे रक्षण करू” या भावनेने नात्याची जाणीव ठेवत चिमुकल्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरी केली आहे.

राखीच्या सनाला एकच मागनं भावाला ,वाचव रे बहिणीला ,जगव रे बहिणिला ‘ असे भावपूर्ण आवाहन करत प्रशालेच्या शिक्षिका उषा पाटील मॅडम यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सणा विषयिची माहिती सांगितली तर असे सामुहिक सन साजरी केल्याने विद्यार्थ्यांनमध्ये नैतीक मुल्य ,बंधुता,व संस्कृतीचे रुजवणुक केली जाते असे प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या .

वर्गात सर्व बहिणीनी शाळेतल्या भावांना राखी बाधून आपल्या रक्षणाच्या बंधनात बांधुन घेतले. व अपल्या रक्षणाची जबाबदारी भावांवर सोपवली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, चंदू पाटील, उषा पाटील मॅडम, गोपाल गावित, यावेळी विद्यार्थ्यांचे माता, पालक उपस्थित होते. शिक्षकांनी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी पार पाडला. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.