वृक्षांची कत्तल करणार्‍यांना अटक करा

0

निजामपुर। साक्री तालुकयातील माळमाथा परिसरात अनेक झाड़े लावण्यात आली होती. पंरतु अज्ञात इसमाने झाडाचे नुकसान केले आहे. याबाबत निजामपुर येथिल नागरीकानी निजामपुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात पावसाळ्यात चार कोटी झाड़े लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. झाडे लावा झाडे जगवा असे कार्यक्रम सुरु असतांना निजामपुर ड़ी एस राणे कॉलनीत राञी अज्ञात इसमाने परिसरातील वुक्षाची तोडणी व संरक्षण जाळयाचे नुकसान केले आहे.

लवकर व्हावी कारवाई
याबाबत निजामपुर पोलीस स्टेशनला डॉ. महेश ठाकरे, निलेश जैसवाल,अतुल पवार, कनहैयालाल चौरे, एस एस सुर्यवंशी, मराठे, बागुल व परिसरातील नागरिकांनी झाडांचे नुकसान करणार्‍या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद दिली आहे.