वृक्षांच्या लागवडीसोबत लोकसहभागातून संगोपन चळवळ उभी करा

0

शहादा । वृक्षांची लागवड करुन उपयोग नाही त्याचे संगोपन होणे गरजेचे आहे. याकरिता सामाजिक संस्था लोकसहभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपन ही चळवळ उभी राहिली पाहिजे असे प्रतिपादन आ. उदेसिंग पाडवी यांनी चांदा ते बादा या वनविभागाच्या रथ यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष, चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया. या अंतर्गत सन 2018 साठी वृक्ष लागवडचे जनजागृती रथ यात्रा आज शहादा येथील उत्तर वन विभाग नंदुरबार विभाग शहादा येथे पोहचली आहे. जिल्ह्यात प्रथमच रथ यात्रेचे उद्घाटन आ. उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते झाले.

यांनी पाहिले कामकाज
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी मार्गदर्शंन केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. सुत्रसंचालन व्ही.टी. पद्मोर तर आभार आर.जी. लामगे यांनी केले. यशस्वीतेसाठी पी.आर.वाघ, वाय.बी.भाबड, अश्‍विनी चव्हाण, डी.ए. परदेशी, पी.एम.महाजन, बीलाल शहा, संजय पवार, एस.आर. चौधरी, एस.जी.मुकाटे, डी.डी.पाटील यासह वन कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नंदुरबार विभाग शहादा उप वनसंरक्षक एम.बी.केवटे, सहायक वनसंरक्षक पी.पी. सुर्यवंशी, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिनेश खंडेलवाल, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, मंदाणे उपसरपंच अनिल भामरे, लक्ष्मीकांत वसावे, वनपाल अनिल पवार, आर.जी. लमागे, बी.के.थोरात, सचिन खूने, पी.आर. निळे, एस.बी. इंदवे, ए.एम. बोरुटे, व्ही.टी.पदमोर, मानमोड्या सरपंच भिवाजी आदी उपस्थित होते.

कागदोपत्री शासनाची दिशाभूल
आ. पाडवी यांनी म्हटले की, राज्य शासनाने तीन वर्ष अगोदर जालयुक्त शिवार व वृक्ष रोपण हे दोन महत्वाकांक्षी निर्णय जनतेच्या सहभागातून घेतले आहे. मात्र जाल्युक्त शिवार योजनेत अनेक ठिकाणी कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे. गत दोन वर्षात राज्यात व जिल्ह्यात किती झाडे लावली गेलीत व त्यातील किती जगली याचा आढावा न अधिकार्‍यांनी घेतला न लोकप्रतिनिधींनी घेतला आहे,असे आ. पाडवी यांनी म्हटले आहे.