यावल। राज्य शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. प्रामुख्याने यावल पोलिसांनी वृक्षारोपणातून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. पोलिस प्रशासनातर्फे पोलिस वसाहत आणि परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. सर्वधर्मिय प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत लावलेले हे रोपटे शहरातील सामाजिक सलोख्याचे प्रतिक ठरेल, असे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी मौलाना शमीम बाबा, अरण्यभंते महानाम, तहसीलदार कुंदन हिरे, नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते, उपनिरीक्षक अशोक आहिरे आदी उपस्थित होते. यानंतर पालिका संचलित साने गुरूजी विद्यालयात शालेय समिती अध्यक्ष दीपक बेहेडे, शरद कोळी, नगरसेवक राकेश कोलते, सुधाकर धनगर, दीपक वाणी आदींच्या उपस्थित झाडे लावण्यात आली. कोरपावली जिल्हा परिषद शाळेत चेअरमन जलील पटेल, सरपंच सविता जावळे, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, मुख्याध्यापक धनराज कोळी, ग्रामपंचायत सदस्य सर्फराज तडवी, इस्माईल तडवी, गफूर तडवी, पुष्पा भालेराव, आशा तडवी, दीपक तायडे यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.
सातोद ग्रामपंचायत
सातोद ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव यांनी वृक्षारोपणास सुरुवात केली. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, सरपंच लिना पाटील, उखा भिल्ल, अतुल भालेराव आदी उपस्थित होते.