वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0

भुसावळ। शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या वृक्षारोपण मोहिमेस शहर व परिसरातील सामाजिक व शैक्षणिक संस्थांतर्फे प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी वृक्षरोपण करण्यात येत आहे.

अहिल्यादेवी विद्यालय
येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका प्राची देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनींनीसुध्दा उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धन हा पर्यावरणाचे संतुलन राखले जाते याची जाणिव विद्यार्थीनींना देण्यात आली. प्रसंगी कडुनिंब, गुलमोहर अशा वृक्षांची लागवड करण्यात आली.

आंबेडकर विद्यालय
सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयात संस्थाध्यक्ष एस.पी. सपकाळे तसेच मुख्याध्यापक एस.पी. चौधरी, माध्यमिकचे मुख्याध्यापक गजानन इंगोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीसुध्दा झाडे लावून सहभाग घेतला.

वरणगाव महाविद्यालय व पोलीस ठाण्यात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व पोलिस ठाण्यातील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत प्रभारी प्राचार्य अनंतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य दिपक मराठे, रासेयो प्रमुख प्रा. अनिल शिंदे, सहायक प्रा. अशोक चित्ते, प्रा. वृषाली जोशी, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी व पीएसआय प्रदिप ठुबे, उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्या हस्ते पोलिस आवारात वृक्ष रोपन करण्यात आले. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी, जितेद्र नारेकर, राहुल येवले, संजय निकुंभ आदी कर्मचारी उपस्थित होते.