भुसावळ। महाबली क्रीडा प्रसारक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कबड्डी दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदिप महाजन व मंडळाच्या सदस्यांनी ठोके नगर भागात वृक्षारोपण करुन त्यांना ट्री गार्ड बसवून पर्यावरणपुरक कबड्डी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आवळा, कडूनिंब, अर्जून व बेरड या वृक्षांच्या कलमांचे रोपण करण्यात आले.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदिप महाजन, धिरज अग्रवाल, निलेश इसाळगे, धिरज धांडे, गौरव परदेशी, मुकुंद शिंदे, सागर सोनवणे, किरण बेलसकर, राहुल वानखेडे, शुभम कोळी, हेमंत चौधरी, मनिष लोहार, निखिल झोपे आदींनी सहकार्य केले.